प्रत्येक 'ती' आणि प्रत्येक 'तो'
प्रत्येक 'ती' आणि प्रत्येक 'तो'
आयुष्यात असं एक वळण नक्की येतं
काय अन् कसं काही कळत नसतं
आयुष्य मात्र आपल्या गतीनं पुढे सरकत असतं
प्रेम प्यार सगळंच खोटं
हे मनाला समजत नसतं
आयुष्य मात्र आपल्या गतीनं पुढे सरकत असतं
वरवरच्या देखाव्याला तिचं मन हे भुलत असतं
त्याला मात्र फक्त तिचं तन हवं असतं
आयुष्य मात्र आपल्या गतीनं पुढे सरकत असतं
चुकार होणारे स्पर्श कधी रोजचे होऊन जातात
हे तिचं तिलाही कळत नसतं
आयुष्य मात्र आपल्या गतीनं पुढे सरकत असतं
प्रेम नावाच्या जाळ्यात
ती नावाचं निष्पाप सावज सहज फसत असतं
आयुष्य मात्र आपल्या गतीनं पुढे सरकत असतं
कधीतरी वेळेबरोबर ती ही सावरत असते
पण कुणीतरी ती सावरण्याची जणू वाट बघत असते
आयुष्य मात्र आपल्या गतीने पुढे सरकत जाते
प्रेमाच्या या बाजारात पुन्हा तिची किंमत ठरते
सावरलेल्या तिच्या आयुष्यात पुन्हा कोणी शिरकाव करते
आयुष्य मात्र आपल्या गतीने पुढे सरकत जाते
नसेल तसा हा कदाचित
असा विचार पुन्हा ती ही करते
आयुष्य मात्र आपल्या गतीने सरकत जाते
कालांतराने पुन्हा जखम ओली होते
पुन्हा एकदा जुन्या आठवणींची खपली निघते
आयुष्य मात्र आपल्या गतीने पुढे सरकत जाते
तिच्यासाठी फक्त शरीर सुख हे प्रेम नसते
पण त्याला मात्र फक्त तिच्या शरीराची किंमत असते
आयुष्य मात्र आपल्या गतीने पुढे सरकत जाते
प्रत्येक त्याला ती फक्त शरीरसुखासाठी हवी असते
पण प्रत्येक त्याच्या डोळ्यात वासनांध हाव बघताना मात्र प्रत्येक ती तुटत असते
आयुष्य मात्र आपल्या गतीने पुढे सरकत जाते
प्रत्येक त्याच्या नजरेतून वासनांध घाव झेलताना
आता प्रत्येक ती प्रखर बनते
आता मात्र आयुष्य तिच्या गतीने सुरू होते
आता प्रत्येक ती तिच्या प्रमाणे आयुष्याला पूर्णत्वास नेते....
अनु
Here's the dark side of relationship nowadays... When most of relations start in name of love,care, trust etc but end up looking to fulfill sexual desires and manier times it's a girl who is an innocent victim...It has become a saying so that males love because they want to be physical and females become physical because they love... But even after being through the experience once she trustes someone over again and she has to face same lust this breaks her yet she rises up and makes herself stronger than before....
Nice
ReplyDeleteThank you.. ☺
DeleteNice
ReplyDeleteThank you...☺
DeleteNice one😘😘😘
ReplyDeleteThank you... ☺
DeleteVery nice 😍😍👌 keep going..
ReplyDeleteThank you dear...☺🥰
DeleteProud of you anu😘
ReplyDeleteThank you dear... 😍😍
DeleteWow😍😍
ReplyDeleteThank you dear...😘😘😘
DeleteNiceee....❤❤
ReplyDeleteThank you dear....😍🥰
DeleteNice
ReplyDeleteThank you...☺
Deletetrue feelings but nice poem
ReplyDeleteThank you Ami... ☺
DeleteFantastic:) khup mog keep on writing....
ReplyDeleteThank you for your appreciation dear...It means a lot...☺😍
Delete