Posts

Showing posts from February, 2020

मी नसूनही तू आहेस...

Image
मी नसूनही तु आहेस.... मी तुझ्या जगात नाही पण तु तर माझ्या आहेस ना मी तुझ्या सवयीतली नाही पण तु तर माझ्या अंगवळणी आहेस ना मी तुझ्या कटाक्षात देखील नाही पण तु तर माझ्या ध्यानी सतत आहेस ना मी तुझ्या जाणीवेतही नाही पण तु तर माझ्या चाहुलीत सुध्दा आहेस ना मी तुझ्या प्रवासात नाही पण तु तर माझ्या प्रत्येक पावलावर सोबत आहेस ना मी तुझ्या शब्दात देखील नाही पण तु तर माझ्या नि:शब्दातही आहेस ना मी तुझ्यासाठी कुठेच नाही मग तु सतत माझ्या आठवणीत का आहेस....????                                                                          अनु A person who is everything for you.. But unfortunately you mean nothing to him... You find him in every thing you did...In the world you created for yourself, in every action of yours, in your silent words...Only thing you admire is that one person...And one fine day you questi...

प्रत्येक 'ती' आणि प्रत्येक 'तो'

Image
  प्रत्येक 'ती' आणि प्रत्येक 'तो' आयुष्यात असं एक वळण नक्की येतं  काय अन् कसं काही कळत नसतं  आयुष्य मात्र आपल्या गतीनं पुढे सरकत असतं प्रेम प्यार सगळंच खोटं  हे मनाला समजत नसतं  आयुष्य मात्र आपल्या गतीनं पुढे सरकत असतं वरवरच्या देखाव्याला तिचं मन हे भुलत असतं त्याला मात्र फक्त तिचं तन हवं असतं  आयुष्य मात्र आपल्या गतीनं पुढे सरकत असतं  चुकार होणारे स्पर्श कधी रोजचे होऊन जातात हे तिचं तिलाही कळत नसतं आयुष्य मात्र आपल्या गतीनं पुढे सरकत असतं  प्रेम नावाच्या जाळ्यात ती नावाचं निष्पाप सावज सहज फसत असतं आयुष्य मात्र आपल्या गतीनं पुढे सरकत असतं  कधीतरी वेळेबरोबर ती ही सावरत असते  पण कुणीतरी ती सावरण्याची जणू वाट बघत असते  आयुष्य मात्र आपल्या गतीने पुढे सरकत जाते  प्रेमाच्या या बाजारात पुन्हा तिची किंमत ठरते  सावरलेल्या तिच्या आयुष्यात पुन्हा कोणी शिरकाव करते  आयुष्य मात्र आपल्या गतीने पुढे सरकत जाते  नसेल तसा हा कदाचित  असा विचार पुन्हा  ती ही करते  आयुष्य मात्र आपल्या गतीने सरकत जाते  क...