Posts

मी नसूनही तू आहेस...

Image
मी नसूनही तु आहेस.... मी तुझ्या जगात नाही पण तु तर माझ्या आहेस ना मी तुझ्या सवयीतली नाही पण तु तर माझ्या अंगवळणी आहेस ना मी तुझ्या कटाक्षात देखील नाही पण तु तर माझ्या ध्यानी सतत आहेस ना मी तुझ्या जाणीवेतही नाही पण तु तर माझ्या चाहुलीत सुध्दा आहेस ना मी तुझ्या प्रवासात नाही पण तु तर माझ्या प्रत्येक पावलावर सोबत आहेस ना मी तुझ्या शब्दात देखील नाही पण तु तर माझ्या नि:शब्दातही आहेस ना मी तुझ्यासाठी कुठेच नाही मग तु सतत माझ्या आठवणीत का आहेस....????                                                                          अनु A person who is everything for you.. But unfortunately you mean nothing to him... You find him in every thing you did...In the world you created for yourself, in every action of yours, in your silent words...Only thing you admire is that one person...And one fine day you questi...

प्रत्येक 'ती' आणि प्रत्येक 'तो'

Image
  प्रत्येक 'ती' आणि प्रत्येक 'तो' आयुष्यात असं एक वळण नक्की येतं  काय अन् कसं काही कळत नसतं  आयुष्य मात्र आपल्या गतीनं पुढे सरकत असतं प्रेम प्यार सगळंच खोटं  हे मनाला समजत नसतं  आयुष्य मात्र आपल्या गतीनं पुढे सरकत असतं वरवरच्या देखाव्याला तिचं मन हे भुलत असतं त्याला मात्र फक्त तिचं तन हवं असतं  आयुष्य मात्र आपल्या गतीनं पुढे सरकत असतं  चुकार होणारे स्पर्श कधी रोजचे होऊन जातात हे तिचं तिलाही कळत नसतं आयुष्य मात्र आपल्या गतीनं पुढे सरकत असतं  प्रेम नावाच्या जाळ्यात ती नावाचं निष्पाप सावज सहज फसत असतं आयुष्य मात्र आपल्या गतीनं पुढे सरकत असतं  कधीतरी वेळेबरोबर ती ही सावरत असते  पण कुणीतरी ती सावरण्याची जणू वाट बघत असते  आयुष्य मात्र आपल्या गतीने पुढे सरकत जाते  प्रेमाच्या या बाजारात पुन्हा तिची किंमत ठरते  सावरलेल्या तिच्या आयुष्यात पुन्हा कोणी शिरकाव करते  आयुष्य मात्र आपल्या गतीने पुढे सरकत जाते  नसेल तसा हा कदाचित  असा विचार पुन्हा  ती ही करते  आयुष्य मात्र आपल्या गतीने सरकत जाते  क...

वाट त्याची पाहाताना...

Image
      वाट त्याची पाहाताना...  नखशिखांत त्याला न्याहाळणारी ती आजकाल फार तिचा गुंता होतो या न् त्या मार्गाने दुरावा दोघातला वाढत जातो नीट बघता ही येत नाही असा हिरमुसला उगाचच सुर तिचा होतो अवतीभवती पण नजरेआड कुणास ठाऊक तो कुठे दडून बसतो मान-मर्यादा सारेच अडते त्याला पाहाता सारे भान हरपते दोन शब्दांसाठी त्याच्या मन तिचे ही हरखते फुलापरी फुलणे तिचे कदाचित त्याला कळूनही न कळते सहवास त्याचा क्षणाचा स्मरता तिच्या गाली लाज दाटून येते म्हणते मन हे होणे नाही तरीही दुर साद जाते माहीत असूनि उत्तर येणे नाही.........................                                                            अनु Love an undecided emotion more than a feeling for someone we confide in...In today's Era we see stories and poems about one-sided love is about how boys go through it... So, here's a girl's version when she falls in love but unfort...

तुटली तार अशी...

Image
               तूटली तार अशी.............  आज चालता त्या पायवाटेने एकटी पावले अवघी रक्ताळली पुसता मज प्रश्न कुणी सखी तुझी का नसे तुज बरोबरी ह्रदयातली जखम पुन्हा ओलावली नसे सखी हात आज तुझा हाती तू रंगलीस कुण्या रंगी झाले मी रंगहीन अशी सांगु कोण्या शब्दांनी परके घन दाटता अपुल्या मैत्रीच्या अंगणी पुरती कोलमडून पडते बघ मी वेडावून जाती साऱ्या आठवणी क्षणोक्षणी कशी तुटली तार अशी ना समजे दैवाची खेळी मीच का पडते तोंडघशी दुःख का नेहमी माझ्या भाळी हाच प्रश्न टोचतो मनी ज्याचे उत्तर नसे कुठल्याही पानी........................                                                                      अनु Blood relations are decided by God, but friends are the relations we choose to be with...At various turns in our life we meet unknown people, slowly they become known and are la...

लेक वयात येते तेव्हा...

Image
                      लेक वयात येते तेव्हा... लेक वयात येते तेव्हा  आई तुझी साथ मागते लेक वयात येते तेव्हा माय तुझ्यासारखी तिच्यासाठी दुसरी मैत्रीण नसते  लेक वयात येते तेव्हा  ती फक्त तुझ्या विश्वासाला आसूसते  लेक वयात येते तेव्हा  ती तुझ्या मायेच्या दोन शब्दांना थांबते  लेक वयात येते तेव्हा  ती हळुहळु नाती उलगडते   लेक वयात येते तेव्हा  तिला आई कळते लेक वयात येते तेव्हा  तिला फक्त आईच हवी असते..... This poem represents the mother's need that is felt by a child,specially girl.. When she enters her teenage...It's the phase in the girl's life wherein she discovers "Newness " in herself...On the way to her beautiful Blooming journey she seeks support from her mother, for her mother becomes her best friend, she wants her mother to  have trust in her,when she does new things she awaits her mother to give a word of appreciation,even when new relations enter her life, ...